बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जम्मू कश्मीर | बस दरीत कोसळून ३३ यात्रेकरू ठार झाल्याची घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे घडली आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली आणि हा दुर्दैवी अपघात घडला आहे. बस चालकाला देखील या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या बसमध्ये ५५ यात्रेकरू होते. त्यामधील ३३ जण जागीच ठार झाले आहेत.

अपघात एवढा भीषण होता कि काही किलो मीटर पर्यंत या अपघाताच आवाज ऐकू गेला. आवाज ऐकल्या नंतरच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. प्रशासनाचे लोक मदत कार्यास दाखल होईपर्यंत येथील स्थानिकांनी लोकांना बस मधून बाहेर निघण्यास मदत केली. प्रशासनाचे लोक मदत कार्यास दाखल होताच त्यांनी जखमी लोकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघात ३३ यात्रेकरू ठार झाले आहेत. तर २२ यात्रेकरू जखमी झाल आहेत. या अपघातात चालक देखील जागीच ठार झाला आहे.