धक्कादायक ! वीज कोसळून ४० शेळ्या आणि दोन मेंढपाळ जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे 

जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पाऊसात झाडावर वीज कोसळून दोघा मेंढपाळांसह ४० शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी तालूक्यातील अंधापूरी शिवारात सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी साडे सहाच्या  सुमारास घडली असुन जखमी वर परळी येथे उपचार सुरू आहेत.

मागील चार दिवसापासुन वातावरणात बदल होऊन सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात तालूक्यातील अनेक भागात नुकसानीच्या घटना घडल्या तर तालूक्यातील अंधापूरी येथे झाडावर विज कोसळून दोन शेळी पालक व ४o शेळ्यांचा मुत्यू झाल्याची घटना घडली.

बिड जिल्हयातील धारूर तालूक्यातील सुनवाडी येथील ५० वर्षीय शेळी पालक रामभाऊ साधू शिंदे, बालू सिताराम काळे, कृष्णा रामभाऊ शिंदे ही तिघे जन मागील काही दिवसा पासून अंधापूरी शेत शिवारात गावातील शेतकरी सखाराम मोरे यांच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी राहत होते. दरम्यान सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी सात साडे सातच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसास सुरुवात झाल्याने शेळी पालक शिंदे आपल्या दोन साथीदार व शेळ्यासह शेतातील झाडाखाली आश्रयास थांबले असता त्याच वेळी झाडावर विज कोसळल्याने ४० शेळ्यासह बालू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे हे होरपळून जागीच ठार झाले. तर रामभाऊ शिंदे हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर पाथरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून आंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. तसेच घटनेचा पंचनामा पाथरी तहसील कार्यालयाच्या महसुल विभागाकडून करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या

उस्मानाबादमध्ये हाय होल्टेज ड्रामा ;शिवसेना खासदारानेच ओमराजेंच्या विरोधात दाखल केला गुन्हा

तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा

उदयनराजेंना टोलापिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

Leave a Comment