नवऱ्यानेच लावून दिले बायकोचे तीच्या प्रियकरासोबत लग्न

0
41
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भागलपुर ( बिहार ) | नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत लग्न करण्याची मुभा दिल्याची कथा आपण चित्रपटात बघितली असेल मात्र हि  कथा बिहार मध्ये सत्यात उतरलेली पाहण्यास मिळाली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोचे लग्न तीच्या प्रियकरा सोबत लावून दिले असून त्याचा पोटचा दीड वर्षाचा मुलगा  देखील बायकोला आंदण म्हणून दिला आहे.

बिहार मधील भागलपुर शहरा जवळील सालेपुर गावची हि घटना आहे. सालेपूर येथे दोघे पती पत्नी एका भाड्याच्या खोलीत राहत होते. नवऱ्याला एका खटल्यात जेल झाली. त्यानंतर तो जेलमध्ये असताना त्याच्या बायकोचे भाड्याने राहत असलेल्या खोली मालकाच्या मुलाशी प्रेम संबंध जुळले.  मुलगा अविवाहित आणि हि महिला विवाहित होती.  तरी देखील त्यांच्यात सुत जुळले होते.

ज्यावेळी नवरा जेल मधून सुटून आला त्यावेळी त्याला त्याच्या पत्नीने सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याने स्वताच आपल्या पत्नीचा विवाह तीच्या प्रियकराशी लावून दिला आहे. त्याच्या दीड वर्षांच्या मुलाला आईची आठवण येवू नये म्हणून त्या मुलाला आई सोबत राहण्याची मुभा दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगात आली  असून या  सर्व प्रकारावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here