विधानसभा निवडणुकीत पार्थ पवारांचे होणार कमबॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे त्यांच्या कडून पराभव झाला. या पराभवाचे शल्य मनात धरून नबसता पार्थ विधानसभेच्या मैदानात उतरून पक्षाचा चांगलाच प्रचार करणार आहे असे चित्र सध्या बघायला मिळते आहे. कारण पिंपरी ,चिंचवड आणि भोसरी या तीन मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ज्यावेळी पार पडणार आहेत. त्यावेळी स्वतः पार्थ पवार या मुलाखतीला उपस्थितीत राहणार आहे.

येत्या रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, विद्या चव्हाण, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये तीन मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रंगणार आहेत. त्या मुलाखती घेण्यासाठी पार्थ पवार उपस्थित राहणार आहेत हे समजतातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह दाटून आला आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन मदतरसंघापैकी भोसरी मतदारसंघाचे तिकीट फिक्स मानले जात असले तरी इतर दोन मतदारसंघासाठी मोठी लढत बघायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार हे बघण्यासारखे राहणार आहे. तर भोसरीमध्ये माजी आमदार विलास लांडे यांना तिकीट जवळपास फिक्स मानले जाते आहे. तर या तीन मतदारसंघात आत्ता पर्यंत २१ अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली आहे.

Leave a Comment