श्रीनगर वृत्तसंस्था | पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. भारतीय लष्करानंही प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय.
भारतीय सेनेनं मंगळवारी रात्री गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. पाकिस्तानच्या या गोळीबारात पाच जवान जखमी झाले होते. बुधवारी पाकिस्तान सैनिकांनी पुंछ जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास मेंढर, बालाकोट आणि कृष्णा खोऱ्यातील सेक्टरमध्ये पुढच्या चौक्यांवर आणि रहिवाशांच्या घरांवर गोळीबार केला होता. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.भारतीय जवानांनी इथेही हा हल्ला परतवून लावला होता.
गुरुवारी सकाळी जवळपास ७ वाजता हा गोळीबार बंद झाल्याचं समजतंय. गेले सात दिवस पाकिस्तानकडून सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील सुरक्षा दलाच्या चौक्यांवरही पाकिस्तान्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सेनेनंही याचा सडेतोड प्रत्यूत्तर दिले आहे.
इतर महत्वाचे –
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय