नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘अशा’ शुभेच्छा कि मोदींही नाही आवरले हसू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सभेच्या शिष्टाचारानुसार अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोकसभेचे सर्व दलीय नेते अध्यक्षांचे आभिनंदन करतात. या प्रगतानुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोकसभे मध्ये गेले होते. त्या ठिकाणी लोकसभेच्या अध्यक्षांना आठवलेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

“एक देश का नाम है रोम

लेकीन लोकसभा के अध्यक्ष बने बिर्ला ओम

लोकसभा का आपको अच्छा चलना है काम

वेल में आणेवालो का बॅल्कलीस्ट मे डालना है नाम”

हि कविता सादर करून रामदास आठवले  यांनी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही कमी हसतामात्र मी तुम्हाला खुप हसवणार आहे असे अध्यक्षांना म्हणून रामदास आठवले यांनी सभागृहात हशा पिकवला. कवितेच्याच माध्यमातून त्यांनी राहुल गांधी यांना देखील चिमटे काढले. तर एका खासदाराने त्यांना राहुल गांधींचा आज वाढदिवस आहे असे सांगितले त्यावर त्यांनी राहुल गांधीना शुभेच्छा दिल्या नाहीत तर लोकसभेच्या सभागृहात तुम्हाला बसण्याची संधी मिळाली त्यामुळे मी तुमचे अभिनंदन करतो असे म्हणून रामदास आठवले यांनी खेळामेळीच्या वातावरणात राहुल गांधी यांच्या वर्मी घाव घातला आहे.

मला जर लोकसभेची संधी मिळाली असती तर मी निवडूनच आलो असतो असे रामदास आठवले यांनी म्हणले आहे. तर मी  आधी तुमच्या सोबत होतो  आता मी भाजपच्या सोबत आहे. मला हवेचा अंदाज कळतो. आणखी एकदा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत येणार आहेत असे रामदास आठवले यांनी म्हणले आहे.