आढळराव पाटलांचा कोल्हेंवर पलटवार ; कोल्ह्याने किती खोट बोलावं याला पण मर्यादा असते

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंचर प्रतिनिधी | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी मतदान पार पडत आहे.  या  निमित्त आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान केंद्राच्या बाहेर आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात अमोल कोल्हे यांच्यावर कडवी टीका केली आहे.

शिवसेना आमदारावर मतदानादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ; गाडी तपासली असता सापडली रोकड

खेड राजगुरूनगर येथील राष्ट्रवादीच्या समारोप सभेत अमोल कोल्हे यांनी आपल्याला उदयनराजेंच्या विरोधात उभा राहण्यासाठी शिवसेनेने आग्रह केला त्यामुळे आपण शिवसेना सोडली असे खळबळजनक विधान केले होते.  त्या विधानावर आज आढळराव पाटील  यांनी  उत्तर दिले आहे. कोल्ह्यानेकिती लबाड बोलावे याला देखील मर्यादा असते असे सूचक विधान आढळराव पाटील यांनी केले आहे.

म्हणून मी शिवसेना सोडली ; अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना पक्ष कोणालाही निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरत नाही.निवडणूक लढवायची कि नाही तो ज्या त्या शिवसैनिकाचा व्यक्तिगत प्रश्न असतो. मात्र एका पाठोपाठ एक खोट बोलत गेलेल्या अमोल कोल्हे यांच्या विधानावर जनतेने कसा विश्वास ठेवावा. सुरुवातीला अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडताना आपण पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवणारा माणूस आहे असे म्हणले होते. त्यानंतर त्यांनी संभाजी मालिका बनवण्यासाठी आपल्याला शिवसेनेच्या एका खासदाराने मदत केली नाही म्हणून मी शिवसेना सोडली आहे असे म्हणले. तर आता उदयनराजेंचे नाव ते पुढे करत आहेत असे आढळराव पाटील म्हणाले आहेत.

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी