माजी गृहमंत्र्यांना नडणारे हे DYSP नक्की आहेत तरी कोण?

1
563
Suraj Gurav DYSP
Suraj Gurav DYSP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | ”साहेब आम्ही नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर यायचं नाही. गडचिरोलीच काय घरी जाईन, मी घाबरत नाही. आता तुम्ही निघायचं,” अशा सणसणीत शब्दांत डीवायएसपी सुरज गुरव यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ अाणि माजी गृहमंत्री सतेज पाटील यांना सुनावले.

माजी गृहमंत्र्यांना नडनार्या आणि कोल्हापूरात चर्चेला कारण ठरलेल्या डी.वाय.एस.पी. सुरज गुरव यांच्याबद्दल जाणूण घेण्याची उत्सुकता आहे. गुरव यांनी भाजप नेत्याना नीट वागवले मात्र ठरावीक लोकप्रतिनिधींना त्यांनी हटकले अशी तक्रारही होत आहे.

कोण आहेत सुरज गुरव?

सुरज गुरव हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे रहिवासी आहेत. गुरव 2013 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. नाशिक ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली.

सुरज गुरव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाले. शाहूवाडीनंतर ते सध्या करवीर पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. कोल्हापूर शहर प्रभारी उपअधीक्षक म्हणून सध्या त्यांच्याकडे कार्यभार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here