कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तीन जागेवर विजय मिळाला आहे. तर विरोधी गटाचे अनेक उमेदवार हे मतामध्ये आघाडी घेवून असल्याने गोकुळमध्ये सत्तातांराचे संकेत दिसू लागले आहेत.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या बाजूने लागले आहे. या आघाडीचे मागास उमेदवार अमरसिंह पाटील ४३६, मागासवर्गीय उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर ३४६ , बयाजी शेळके 239 मतांनी विजयी झाले. महिला प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चुरस असून सुमारे १०० मतांचे मताधिक्य घेतले आहे.
गोकुळच्या मतमोजणी महिला गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक, अनुराधा पाटील, स्मिता पाटील पिछाडीवर आहेत. तर आतापर्यंत मोजलेल्या नऊशे मतांमध्ये विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी आघाडी घेतली आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी गटातील मतमोजणीला प्रारंभ झाला असून महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून पालकमंत्री सतेज पाटील- कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या दिशेने कौल दिसू लागला आहे. गोकुळचा आतापर्यंत लागलेला निकाल सत्तातंराचे संकेत देत आहे. निवडणुकी निकालाविषयी पश्चिम महाराष्ट्रात ऊत्सुकता शिगेला पोहचली आहे.
शाैमिका महाडिक विजयी ः फेरमतमोजणीची मागणी
सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी झाल्या आहेत. महाडिक कुटुंबियात पहिल्यांदाच उमेदवारी दिली होती. महादेवराव महाडिक आघाडीने खातं खोललं परंतु विरोधी गटाकडून फेर मतमोजणीची मागणी केली आहे.