आयपीएल मधील ‘हा’ संघ आहे सर्वोत्कृष्ट ; वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा व्यक्त केले मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 स्पर्धा आता रंगतदार स्थितीत आली आहे. प्ले ऑफ मध्ये पोचण्यासाठी प्रत्येक संघ अतोनात प्रयत्न करत असून सामने रंगतदार होत आहेत. त्यातच वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara)ने आयपीएल (IPL 2020) मधली सर्वोत्तम संघाचं नाव सांगितलं आहे. तो संघ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून 4 वेळा आयपीएल वर नाव कोरणारा मुंबई इंडियन्सचा संघ आहे. यंदाच्या आयपीएल मधेही मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी असून विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मुंबईकडेच पाहिलं जातंय. ब्रायन लारादेखील यंदाच्या वर्षातल्या मुंबईच्या कामगिरीमुळे प्रभावित झाला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेली मुंबई (Mumbai Indians)सर्वोत्तम टीम असल्याचं लारा म्हणाला. ‘चार वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबईला दिल्लीपेक्षा जास्त फायदा आहे, कारण अनुभव त्यांच्या पाठीशी आहे,’ असं लारा स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.

मुंबईने शुक्रवारी कोलकाता (KKR)चा 8 विकेटने पराभव केला. लागोपाठ 5 मॅच जिंकल्यानंतर मुंबईचे 8 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक त्या सामन्याचे शिल्पकार ठरले. 19 बॉल बाकी असतानाच मुंबईने 8 विकेटने ही मॅच खिशात टाकली. ‘येणाऱ्या मॅचमध्येही अशीच कामगिरी करणं गरजेचं आहे, पण या कामगिरीमुळे संतुष्ट होता कामा नये’, असं रोहित शर्मा मॅचनंतर म्हणाला. ‘टीम कशाप्रकारे मॅच हरतात ते आपण बघितलं आहे, त्यामुळे आम्ही विजयासाठी भुकेले असणं गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like