12 हजारांची लाच घेताना ‘महावितरण’च्या कनिष्ठ अभियंत्यास अटक

0
106
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील महावितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास 12 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, त्यास ताब्यात घेण्यात आले असून शरद ओंमकेश्वर असे अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथे एका शेतकऱ्याने शेतीस वीज जोडून देण्याची मागणी लोणंद येथील महावितरण विभागाकडे केली. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या कनिष्ठ अभियंता शरद ओंमकेश्वर (रा. वाठार कॉलनी, लोणंद) याने शेतीला वीज जोडणीसाठी 12 हजारांच्या लाचेची मागणी शेतकरी व्यक्तीकडे केली. त्यावेळी संबंधित शेतकऱ्याने याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. संबंधित अधिकाऱ्याकडे शेतकरी व्यक्ती गेल्यास कनिष्ठ अभियंत्यास लाच स्वीकारत असताना पथकाने रंगेहात पकडले. या घटनेचा अधिक तपास पथकाकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here