कराडला उद्या परीट समाजाचा वधू- वर पालक मेळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्यावतीने रविवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कराड येथील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिरात परीट समाजाचा 28 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुकर कोथमिरे (बारामती) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच परीट समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव सोनटक्के,माजी अध्यक्ष भिकू राक्षे, माजी उपाध्यक्ष बबनराव शिंदे (आप्पा), सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात वधू-वर नोंदणी, संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम, व्याख्यान व समाजाच्या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या मेळाव्यास कराडसह सातारा जिल्ह्यातील परीट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परीट समाजसेवा मंडळाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) यांनी केले आहे.