मोदी हिंदुत्त्ववादी नाहीत, शिंदे- फडणवीस सरकार अनैतिक; भाजप खासदाराचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्त्ववादी नाहीत तसेच महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे अशी टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे आज, २४ डिसेंबरला पंढरपूरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना भाजपलाच घरचा आहेर दिला.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मोदी हे हिंदुत्त्वावादी नाहीत. ते कोणाचेच ऐकत नसून त्यांनी उत्तराखंडमधील सर्व मंदिरं आपल्या ताब्यात घेतली आहेत. मी न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार .ज्यांना असं वाटतं की पंतप्रधान मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचे चमचे आहेत. १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर सुद्धा निशाणा साधला. महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. हे सरकार शिवसेना तोडून बनवलं आहे. त्यांचं प्रकरण न्यायालयत प्रलंबित आहे असं त्यांनी म्हंटल. पंढरपूरचं कॉरिडोअर होणारच, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे यावर भाष्य करताना फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला.