हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सुरु असतानाच उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तसेच लवकरात लवकर मोदींना शरण या नाहीतर तुमचं अस्तित्व संपेल असा इशाराही त्यांनी दिला.
बृजभूषण सिंह यांनी एका जाहीर सभेत महारष्ट्रातील राजकीय परिस्थिती वरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. जेव्हा तुम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली आणि नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेसचा हात पकडला तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही आता एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर तुम्हाला वाईट वाटत आहे.
उद्धव ठाकरे जे भाजपसोबत केलं तेच आता त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यसोबत करत आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्ही मोदींना शरण या नाहीतर तुमचं अस्तित्व राहणार नाही असा इशारा बृजभूषण यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे