औरंगाबाद : शेत जमीन देत नसल्याच्या कारणावरून आरोपीने एका तरुणाचे दोन्ही पाय तोडून त्याचा गळा चिरून निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील येसगाव शिवारात मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एक जण मात्र फरार आहे.
कल्याण पवार असे मृताचे नाव आहे, तर हत्येप्रकरणी अनिस चव्हाण, राहुल विजय पवार, बंडू पवार आणि शिवा महादू पवार या सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चौघेजण अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वाळुज पासून काही अंतरावर असलेल्या एस गाव शिवारात गणपती गायरान मध्ये जाहिरातीबाई पवार ही आपल्या कुटुंबाससह वास्तव्यास आहे. गायरान मधील दहा एकर जमीन कसून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीते.या महिलेच्या नात्यातील राहुल पवार हा पालम ला राहतो. त्याला शिवा महादु पवार याने तेथे बोलावून घेऊन वडीलाकडे असलेली तुझी दहा एकर जमीन घे असे सतत त्यास भडकावात होता. त्यावर जाहिरातीबाईने सदरची जमीन उन्हाळ्यानंतर देण्याचे कबूल केले होते. अशातच गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जाहिरातीबाईचा मुलगा कल्याण हा त्याचा आत्याला म्हणाला की तू दारू पिऊन मुलाबाळांनमध्ये बसू नकोस, तू तुझ्या घरी थांब.यावरून त्याचा मोठा मुलगा आणि कल्याण ला म्हणाला की तूच तुझ्या आईला येथून घेऊन जा, वाद उफाळला व त्यानंतर आरोपींनी कल्याणचे दोन्ही पाय तोडून त्याचा गळा चिरून निर्घुण खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे