जमिनीचा वाद टोकाला पेटला! ट्रॅक्टरखाली 8 वेळा चिरडून भावाची केली निर्घृणपणे हत्या

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जमिनीच्या वादातून भाव भावाचा बळी घेतो, नाती तुटताना, कुटुंब वेगळी होतात, वाद होतात, अशा कित्येक घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. आता आणखीन अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील भारतपूर जिल्ह्याच्या बयाना भागात घडली आहे. याठिकाणी, जमिनीच्या वादातून एका भावानेच आपल्या दुसऱ्या भावाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अड्डा गावात गुर्जर कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद बुधवारी जास्त पेटला. या वादात दोन भावांच्या जबर हाणामारी झाली. इतकेच नव्हे तर, एका भावानेच आपल्या दुसऱ्या भावाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. कुटुंबाने आरोपी भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाचेही न ऐकता त्याने 8 वेळा आपल्या भावावर ट्रॅक्टर चालवला. ज्यामध्ये नरपत सिंह नामक म्हणजेच आरोपीच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुख्य म्हणजे या सर्व घटनेनंतर आरोपी आणि त्याचे कुटुंब घटनास्थळावरून फरार झाले. पुढे या सर्व घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनासाठी पाठविला आहे. तसेच, या सर्व घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.