हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर केले जातात. यापैकीच एका प्लॅनमध्ये ग्राहकांना 455 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यासोबतच डेली 3GB डेटा देखील दिला जातो. ज्या ग्राहकांना डेटा आणि जास्त दिवसांची व्हॅलिडिटी हवी आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय ठरू शकेल. चला तर मग या प्लॅनबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात…
या प्लॅनबाबत सविस्तरपणे चर्चा केल्यास यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्येही ग्राहकांना MTNL कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
त्याचप्रमाणे यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाही मिळणार आहे. म्हणजेच यामध्ये डेली 3GB डेटा लिमिट संपल्यानंतरही इंटरनेट सुरूच राहील. मात्र, स्पीड 40Kbps पर्यंत खाली येईल.
एक प्रकारे, ग्राहकांना या प्लॅनसाठी दररोज फक्त 6.59 रुपयांचा खर्च येईल. अशा प्रकारे, हा भारतातील जास्त व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन ठरला आहे.
मात्र, इथे हे लक्षात घ्या कि, BSNL कडे अजूनही सर्व ठिकाणी 4G नेटवर्क उपलब्ध नाही. मात्र, सरकारी कंपनी भारतातील सर्व सर्कलमध्ये वेगाने 4G नेटवर्कचा विस्तार करणार आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/services/mobile/prepaid_plans_dummy.html
हे पण वाचा :
Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
HDFC Bank कडून ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात पुन्हा केली वाढ
UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन फीचर्स