फक्त कॉलिंग करणाऱ्यांसाठी BSNL चा ‘हा’ प्लॅन ठरेल फायदेशीर, किंमत अन् व्हॅलिडिटी तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत BSNL कडून ग्राहकांसाठी 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला एक प्रीपेड प्लॅन ऑफर केला जात आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना जास्त व्हॅलिडिटी हवी आहे. कमी डेटा आणि फक्त कॉलिंग करणाऱ्यांसाठी हा प्लॅन योग्य ठरेल. कंपनीच्या या 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनमध्ये डेटा बेनेफिट्स दिले जाणार नाही.

BSNL launches Rs 201 prepaid plan, Rs 187 STV and Rs 1,499 STV: Check offers, benefits and more | Technology News | Zee News

बीएसएनएल च्या या प्लॅनची किंमत फक्त 439 रुपये आहे. हा प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच यासाठी डेली फक्त 4.80 रुपये खर्च करावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळतआहे. यासोबतच यामध्ये 300 एसएमएसही दिले जात आहेत. मात्र या व्यतिरिक्त, यामध्ये इतर कोणतेही फायदे उपलब्ध होणार नाहीत. तसेच, नंतर जर कधी डेटाची गरज भासली तर एक वेगळा डेटा प्लॅन खरेदी करता येईल.

Planning to buy BSNL prepaid plans under Rs 200? Check over 10 options | News | Zee News

जर आपल्याला 500 रुपये आणि कॉलिंगसहीत डेटा बेनेफिट्स हवे असतील तर आपण 485 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करू शकता. यामध्ये 82 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत डेली 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 100 SMS मिळतील. तसेच यामध्ये डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 40 Kbp पर्यंत कमी होईल.

BSNL Recharge Plans 2022: List of BSNL Prepaid Recharge Plans and Offers 2022 - BSNL Data Pack, ISD Recharge and TopUp Plans

सध्या 4G सर्व्हिससाठी काम सुरु

यादरम्यान, आता BSNL कडून आपली 4G सर्व्हिस सुरू करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. इतकेच नाही तर येत्या काही वर्षांत BSNL कडून 5G सर्व्हिस देखील अपग्रेड केली जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. BSNL ही भारतातील पहिली टेलिकॉम ऑपरेटर असेल जिच्याकडे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत 4G आणि 5G नेटवर्क असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
5G Smartphones : भारतात विकले जाणारे ‘हे’ 5 स्वस्त 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् किंमत जाणून घ्या
LIC च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 1 लाख रुपयांपर्यंतची पेन्शन !!!
Multibagger Stock : 1 वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल
FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज
गेल्या 20 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!