हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |सध्या देशामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या उदयास आलेल्या आहेत. ज्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. त्यात बीएसएनएल ही एक लोकप्रिय कंपनी आहे. बीएसएनएल ही त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. आता देखील बीएसएनएलने अत्यंत स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे. बीएसएनएलचा (BSNL Best Recharge Plan) हा प्लॅन केवळ 197 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैद्यता 70 दिवस असणार आहे. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला मोफत कॉल त्याचप्रमाणे दररोज 2 जीबीचा डेटा देखील मिळणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी एक चांगली ऑफर ठरू शकते. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही या प्लॅनचा वापर करू शकता.
बीएसएनएलची सर्वात कमी योजना | BSNL Best Recharge Plan
बीएसएनएलचा हा प्लॅन स्वस्त असल्यासोबत त्याचे अनेक फायदे देखील आहेत. कंपनीने या नवीन प्लॅनसह अनेक वैशिष्ट्य देखील प्रदान केलेली आहे. ज्यामुळे आता बीएसएनएल हे जिओ, एअरटेल आणि वोडाफोनशी देखील स्पर्धा करणार आहे. आता आपण बीएसएनएलच्या अशाच काही स्वस्त प्लॅनबद्दल माहिती जाणून घेऊया.
बीएसएनएल सर्वोत्तम योजना
बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन 107 रुपयांचा आहे आणि त्याची वैधता 35 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 35 दिवसांसाठी BSNL Tunes सुविधा, 200 मिनिटांचा टॉक बोनस आणि 3GB मोफत डेटा मिळतो. या रिचार्जनंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटचा आनंदही घेऊ शकता.
बीएसएनएलचा हा प्लॅन २६ दिवसांसाठी आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याव्यतिरिक्त, दररोज 1GB इंटरनेट आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा देखील आहे. कमी बजेटमध्ये हा प्लॅन चांगला पर्याय ठरू शकतो.
BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 70 दिवसांची वैधता मिळते. येथे त्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. दररोज 2 GB डेटाचा बोनस आहे, ज्याचा वेग 40Kbps असेल. याशिवाय दररोज १०० एसएमएसही दिले जातात. हे सर्व फायदे फक्त १५ दिवसांसाठी मिळतील. या सर्व सुविधा या प्लॅनच्या किमतीत खूप चांगल्या वाटतात.