बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

मात्र ही कल्पना आता मागे पडली असून या कंपन्या पूर्णपणे बंद करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना अन्य सरकारी विभागात सामावून घेणे व अन्य कर्मचाऱ्यांना व्हीआरएस (स्वेच्छानिवृत्ती) देणे या पर्यायाची सरकार चाचपणी करत आहे. या दोन्ही कंपन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत. बीएसएनएलचा विचार केल्यास या कंपनीत तब्बल १.६५ लाख कर्मचारी असून एकूण महसुलातील ७७ टक्के रक्कम या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च होते.

यामुळे या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले असून खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतही त्या मागे पडल्या आहेत. बीएसएनएलच्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हीआरएस दिल्यास सरकारला ९५ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असा अंदाज प्रथम व्यक्त करण्यात आला होता. मात्र या कर्मचाऱ्यांची तीन गटांत विभागणी केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment