हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन सादर केले जातात. मात्र एक काळ असा होता कि, जिथे बीएसएनएल शिवाय दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे नाव देखील ऐकायला मिळत नव्हते. आता अनेक टेलिकॉम कंपन्या आल्यामुळे ही सरकारी कंपनी या स्पर्धेत खूपच मागे राहिली. मात्र आता ही कंपनी जोरदार पुनरागमन करत आहे. ज्याअंतर्गत ते सतत नवंनवीन प्लॅन ऑफर करत आहे. दरम्यान, कंपनीने 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन लाँच केला आहे, ज्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना नक्कीच घाम फुटेल.
तर आज आपण BSNL च्या 397 रुपयांच्या प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत. जो इतर कंपन्यांच्या 400 रुपयांपेक्षा कमी प्लॅनपेक्षा खूपच चांगला आहे. हा प्लॅन बीएसएनएलच्या सर्वात लोकप्रिय प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजेच याद्वारे 6 महिने रिचार्ज करण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल.
तसेच कंपनीकडून या प्लॅनमध्ये 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 2 जीबी इंटरनेट देखील मिळणार आहे. तसेच या योजनेमध्ये आणखी फायदे देखील दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, ग्राहकांना डेली100 फ्री एसएमएस आणि फ्री पर्सनल रिंग बॅक टोनचा लाभ देखील मिळेल.
कॉलिंग बाबत बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. इथे हे लक्षात घ्या की, व्हाउचर रिफिल करून, 60 दिवसांनंतरही अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग पुन्हा सुरू करता येईल. याव्यतिरिक्त BSNL चा आणखी एक प्लॅन आहे ज्याची किंमत 399 रुपये आहे.
या प्लॅनमध्ये, 80 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत, 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसची सुविधा मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट
FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ 3 प्रमुख बँका एफडीवर देत आहेत जास्त व्याज
बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय
7th Pay Commission : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का !!! 18 महिन्यांचा DA मिळणार नाही