हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक प्लॅन केले जातात. जवळपास प्रत्येक श्रेणीसाठी वेगवेगळे प्लॅन उपलब्ध आहेत. या प्लॅन्सच्या किंमती तर कमी आहेच मात्र त्याबरोबरच ग्राहकांना जास्त दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळते. जर आपणही कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी असणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर BSNL चा एक प्लॅन आपल्यासाठी उपयोगी ठरेल. चला तर या प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे दिले जात आहेत ते जाणून घेऊया…
2399 रुपये किंमत BSNL च्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 395 दिवसांची आहे. साधारणतः बहुतेक प्लॅन्स हे 1 वर्ष किंवा 12 महिन्यांच्या व्हॅलिडिटी सहीत येतात. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना 13 महिन्यांची व्हॅलिडिटी दिली जाते.
बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि डेली 100 SMS चा लाभही दिला जातो. यासोबतच डेली 2 जीबी डेटा देखील दिला जातो. ज्यानुसार यामध्ये एकूण 730 जीबी डेटा मिळतो. मात्र डेली 2 GB डेटा लिमिट संपल्यानंतर त्याचा इंटरनेट स्पीड 40KBps वर येईल.
BSNL च्या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. कंपनी Telco 30 दिवसांसाठी फ्री PRBT सर्व्हिस देते. तसेच यामध्ये 30 दिवसांसाठी Eros Now एंटरटेनमेंट सर्व्हिस आणि हेलोट्यून देखील देते. जर आपण कमी खर्चात चांगली सर्व्हिस देणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर बीएसएनएलचा 13 महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला हा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 323 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण, आजचे दर तपासा
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत दिला 1920% रिटर्न