BSNL : फक्त 100 रुपयांच्या खर्चात वर्षभर बोला मोफत, सोबत डेटाही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : सध्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना होतो आहे. कारण यामुळे त्यांना अगदी कमी किंमतींत अनेक फायदे मिळणारे आकर्षक प्लॅन उपलब्ध होत आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडूनही आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. ज्यामध्ये अगदी कमी खर्चात जास्त फायदे दिले जातात. चला तर मग आज आपण बीएसएनएलचा अशाच एका प्लॅनबाबतची माहिती जाणून घेउयात…

All BSNL Prepaid Recharge Plans For February 2023 | Cashify Blog

BSNL कडे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्याअंतर्गत 100 रुपयांमध्ये अनेक फायदे मिळतात. आजच्या या बातमीमध्ये आपण 1,198 रुपयांच्या प्लॅनबाबत चर्चा करणार आहोत. हा एक वार्षिक प्लॅन आहे. ज्यामध्ये फक्त एकदा रिचार्ज करून वर्षभराच्या रिचार्जपासून सुटका मिळणार आहे.

Get 84-day validity, 3GB data, free calling, and more at just Rs 106 with  this BSNL recharge | 91mobiles.com

BSNL च्या 1,198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच दर महिन्याला 3GB डेटा देखील मिळेल. मात्र डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 80 kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये दर महिन्याला 30 एसएमएस फ्री देखील मिळतील. या प्लॅनमध्ये दर महिन्याला 300 फ्री मिनिटेही मिळतील.

BSNL validity extension plans 2022: Best recharge plans with validity  extension for BSNL prepaid users | 91mobiles.com

ज्या ग्राहकांना दर महिन्याला रिचार्जच्या त्रासापासून सुटका मिळवायची आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम ठरेल. मात्र हे जाणून घ्या कि, BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त डेटा किंवा अनलिमिटेड कॉल्स दिले जाणार नाहीत. जर आपल्याला फक्त सिम एक्टिव्ह ठेवायचे असेल तर दर महिन्याला 100 रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच दर महिन्याला 300 मिनिटे फ्री टॉक आणि 3 GB डेटा देखील मिळेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
LIC ने लाँच केला जबरदस्त इन्शुरन्स प्लॅन, 15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Aadhaar Card मधील चुकीची माहिती अशा प्रकारे घरबसल्या करा अपडेट
Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​FD वरील व्याजदरात झाली वाढ
Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले