हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. सध्या अनेकांच्या मोबाईल मध्ये 2 सिमकार्ड असतात. त्यामुळे एका सिम वर रिचार्ज केल्यानंतर दुसरं कार्ड बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सिमकार्डची व्हॅलिडिटी संपू नये आणि ते बंद होऊ नये यासाठी अनेकांना विनाकारण रिचार्ज करून पैसे खर्च करावे लागतात. परंतु अशा लोकांचे पैसे वाचवण्यासाठी BSNL ने अनोखा आणि परवडणारा रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लॅनची किंमत फक्त २२ रुपये असल्याने सर्वसामान्य लोकांना नक्कीच परवडणारा असून यामुळे सिमकार्डला तब्बल ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे.
BSNL आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारचे स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्याच पार्श्वभूमीवर ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही आणि जे जास्त फोन कॉल सुद्धा करत नाही अशा ग्राहकांसाठी BSNL आपला हा २२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊन आलं आहे. सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. त्यामुळे विनाकारण जास्तीचे पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही.
22 रुपयेच्या प्लॅन मध्ये काय खास आहे ?
BSNL च्या या 22 च्या रिचार्ज प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पूर्ण 90 दिवसांची वैधता ऑफर करण्यात आली आहे. म्हणजे तुमचे सिमकार्ड बंद पडणार नाही किंवा ब्लॉक सुद्धा होणार नाही. तसेच या प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलसाठी 30 पैसे प्रति मिनिट कॉल दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही या २२ रुपयांच्या रिचार्ज प्लानचा नक्कीच लाभ घ्या.