हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL : सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. आजकाल अनेक कामे स्मार्टफोनच्या मदतीने ऑनलाईनच केली जात आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना कॉलिंग आणि भरपूर डेटाच्या असलेला प्लॅन हवा असतो. त्याच प्रमाणे असेही अनेक ग्राहक आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त नंबर आहेत. मग अशा परिस्थितीत दरमहा महागडा रिचार्ज कसा करावा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो.
तर आता ग्राहकांना यासाठी काळजी करण्याची काहीच गरज भासणार नाही. कारण आज आपण BSNL च्या 3 रिचार्ज प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत 50 रुपयांच्या आत आहे. हे जाणून घ्या घ्या कि, BSNL कडून देण्यात येणाऱ्या या 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि डेटा असे दोन्ही फायदे उपलब्ध असतील.
49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
BSNL च्या या 49 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळतील. ज्याची व्हॅलिडिटी 20 दिवसांची असेल. याशिवाय यामध्ये कॉलिंगसाठी, स्थानिक आणि STD साठी 100 व्हॉईस कॉल मिनिटे आणि 1GB डेटा देखील मिळेल.
29 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
BSNL च्या या 29 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटा देखील मिळेल. 5 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये 1GB डेटा मिळेल.
24 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
BSNL च्या या 24 रुपयांचा प्लॅन हा एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आहे. फक्त सिम ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी हा योग्य प्लॅन आहे. 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंगचा फायदा देखील मिळतो. यासोबत, एसटीडी आणि लोकल कॉलसाठी 20 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Bajaj Finance कडून FD वर मिळत आहे जबरदस्त व्याज, पहा नवीन व्याजदर
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा दुप्पट नफा !!!
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
Budget 2023 : अर्थसंकल्प छापणाऱ्यांना हॉस्पिटलमध्येही जाण्यास असते मनाई, डॉक्टरांची टीमही असते मंत्रालयात कैद!