हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. ज्यासाठी या कंपन्यांकडून अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत. हे लक्षात घ्या कि, सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडूनही ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्रीपेड प्लॅन ऑफर केले जात आहेत. यापैकीच 87 रुपयांचा एक प्लॅन देखील आहे. कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन चांगला पर्याय ठरतो आहे.
आता सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. नुकतेच एअरटेलने सर्व सर्कलमध्ये एंट्री लेव्हल प्लॅनची किंमत 155 रुपयांपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत 87 रुपयांचा हा प्लॅन ग्राहकांसाठी खूप चांगला असल्याचे सिद्ध होईल. बीएसएनएलचा 87 रुपयांचा प्लॅन शॉर्ट टर्म व्हॅलिडिटी ऑफर करतो. यासोबतच यामध्ये डेटाही देण्यात आला आहे.
BSNL च्या या प्लॅन बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना एकूण 14 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. याची खास बाब अशी कि यामध्ये ग्राहकांना डेली 1GB डेटाही दिला जातो. या डेटासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही लाभ दिला जातो. हार्डी मोबाईल गेम्सद्वारे कॉलिंग आणि डेटासोबतच गेमिंगचे फायदेही ग्राहकांना दिले जातात.
मात्र, BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एसएमएसचे फायदे दिले जात नाहीत. तसेच यामध्ये ग्राहकांना एकूण 14GB डेटा उपलब्ध आहे. तसेच जर आपल्याला जास्त डेटा असलेला प्लॅन हवा असेल तर कंपनीचा 97 रुपयांचा प्लॅन घ्या. मात्र, या प्लॅनमध्ये एसएमएसचे फायदेही मिळणार नाहीत. या प्लॅनमध्ये 15 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. ज्यामध्ये डेली 2GB डेटा दिला जाईल. यासोबतच ग्राहकांना लोकधुन कंटेंटही मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do
हे पण वाचा :
Torn Notes : फक्त ‘या’ बँकांमध्येच बदलता येतात फाटक्या नोटा, जाणून घ्या त्यासाठीचे नियम
Gold Price Today : गुढीपाढव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सोने चमकले, तपासा आजचे नवे दर
Realme C35 स्मार्टफोनवर मिळवा आतापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर, फीचर्स तपासा
Home Insurance द्वारे अशा प्रकारे मिळेल आपल्या घरातील नुकसानीची आर्थिक भरपाई
Bank of Baroda कडून रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांची वाढ, पहा नवीन व्याजदर