हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी ३ जुलैपासून मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाप बसत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेला सामान्य माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी घाईला आला आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात असून यामधून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण देशी टेलिकॉम कंपनी BSNL चे सिम कार्ड खरेदी करत आहेत किंवा आपलं आहे ते कार्ड मध्ये BSNL मध्ये पोर्ट (BSNL SIM Port) करत आहेत. तुम्ही सुद्धा तुमचं सिम बीएसएनएल मध्ये पोर्ट करण्याच्या विचारात असाल तर यासाठी सोप्पी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तस पाहिले तर बीएसएनएलचा रिचार्ज प्लॅन हा इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याने सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरदान ठरू शकतो. BSNL च्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंत असते. यामध्ये ग्राहकांना इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येतेय. हि गोष्ट खरी आहे ज्याप्रमाणे BSNL ला Airtel, Jio किंवा Vodafone Idea सारखं फास्ट नेटवर्क मिळत नाही, परंतु पैशाच्या बाबतीत बीएसएनएल नक्कीच परवडणारे सिमकार्ड आहे. त्यामुळे सध्या अनेक ग्राहक त्यांचे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करत आहेत. (BSNL SIM Port)
अशाप्रकारे तुमचा नंबर BSNL मध्ये पोर्ट करा – BSNL SIM Port
तुमचा सध्याचा सिम नंबर BSNL वर पोर्ट करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी 1900 वर एसएमएस पाठवावा लागेल.
त्यासाठी PORT_XXXXXXXXXXXX (फोन नंबर) 1900 वर “एसएमएस करा.
तुम्हाला आता एसएमएसद्वारे एक युनिक पोर्टिंग कोड (UPC) मिळेल.
हा पोर्टिंग कोड 15 दिवसांसाठी वैध असतो.
यानंतर बीएसएनएलचे ग्राहक सेवा केंद्र किंवा किरकोळ विक्रेत्याला भेट देऊन पोर्टसाठी अर्ज करू शकता.
सिम पोर्टसाठी ग्राहकाचा अर्ज भरावा लागेल.
यानंतर तुम्हाला बीएसएनएल सिम कार्ड दिले जाईल.