Budget 2022: लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले,”सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या अनेक योजना”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की,”सरकार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे.” लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला.

राष्ट्रपती म्हणाले की,”लहान शेतकऱ्यांचे (एकूण 80 टक्के) हित सरकारने प्रामुख्याने ठेवले आहे. सरकारही सेंद्रिय शेतीसारखे प्रयत्न करत आहे. पावसाचे पाणी वाचवण्यासाठीही सरकार पावले उचलत आहे.”

राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांबद्दल ‘या’ गोष्टी सांगितल्या…

1. अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी संबोधित करताना सांगितले की,”सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशातील शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सतत काम करत आहे.

2. देशातील 80 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांचे हित माझ्या सरकारने नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 11 कोटींहून जास्त शेतकरी कुटुंबांना 1 लाख 80 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

3. सरकारने सर्वाधिक पिकांची खरेदी केली आहे. खरीप पिकांच्या खरेदीमुळे 1.30 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 2020-21 या वर्षात निर्यात सुमारे 3 लाख कोटींवर पोहोचली आहे.

4. 2020-21 या वर्षात कृषी निर्यातीत 25 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात सुमारे 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

5. फलोत्पादन- मध उत्पादनाच्या बाबतीत आपण पुढे गेलो. 2015-15 च्या तुलनेत 115% वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात सरकारने भाजीपाला, फळे, दूध यासारख्या नाशवंत गोष्टींसाठी गाड्या चालवल्या.

6. देशातील 80% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना सरकारने लाभ दिला आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम देण्यात आली आहे.

7. देशात सिंचन प्रकल्प आणि नद्या जोडण्याचे कामही पुढे नेण्यात आले आहे. केन-बेतवा प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांच्या निधीतून काम सुरू आहे.

8. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार केले जात आहेत. अटल भुजल योजनेतून 64 लाख हेक्टर सिंचन क्षमता विकसित करण्यात आली आहे.

9. महामारी असूनही, 2020-21 मध्ये, आमच्या शेतकऱ्यांनी 30 कोटी टनांहून जास्त अन्नधान्य आणि 33 कोटी टनांहून जास्त बागायती उत्पादनांचे उत्पादन केले आहे.

10. किसान रेलचा शेतकऱ्यांना फायदा झाला. कोरोनाच्या काळात 1900 हून जास्त किसान रेल धावल्या. विचार नवा असेल, तर जुनी संसाधनेही उपयोगी पडू शकतात, हे यातून दिसून येते, असेही कोविंद म्हणाले.

Leave a Comment