नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्गाच्या करदात्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात अर्थसंकल्प 2022 च्या घोषणा करदात्यांना मोठा दिलासा देऊ शकतात. पगारदार वर्गातील करदात्यांना आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 पासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल आणि सरचार्ज कपातीची अपेक्षा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरू होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील.
80C अंतर्गत गुंतवणुकीवर जास्त कर सूट
पगारदार वर्गाबद्दल बोलताना, त्यांना आशा आहे की या अर्थसंकल्पात, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर जास्त टॅक्स सूट जाहीर केली जाऊ शकते. अनेक दिवसांपासून याची मागणी होत असली तरी यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत काही मोठी घोषणा होते का, हे पाहावे लागेल.
नोकरदारांसाठी टॅक्स वाचवण्यासाठी कलम 80C हा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या कलमांतर्गत सूट मर्यादा वाढवली म्हणजे अधिकाधिक लोकांना दिलासा मिळावा. सध्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये सूट आहे.
याशिवाय होम लोनच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा अर्थसंकल्पात 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या मूळ रकमेवर 80C मध्ये वेगळी सूट असावी.
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल अपेक्षित?
गेल्या अनेक वर्षांपासून इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने पगारदार वर्ग अर्थमंत्र्यांकडे बदलाची मागणी करत आहे. मात्र, आगामी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स रेटमध्ये कोणताही बदल जाहीर केला जाणार नाही. आगामी अर्थसंकल्पात सरकार नवीन आणि जुनी टक्स सिटीम लागू ठेवू शकते.