Budget 2023 : गरिबांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, केंद्र सरकार वाढवू शकते उज्ज्वला योजनेचे बजट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1 हजार रुपयांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात स्वयंपाकघरातील खर्च कमी होण्याची आशा देशभरातील महिला वर्गाला लागून राहिली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जात आहे. हे जाणून घ्या कि, चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी सुमारे 5812 कोटींचे बजट ठेवले होते. याशिवाय या योजनेंतर्गत वर्षातील 12 सिलेंडरवर 200 रुपयांची सबसिडी देखील देण्यात येते आहे. अशा परिस्थितीत हे अनुदान सरकार कडून मिल्ने यापुढेही सुरूच राहील, अशी अपेक्षा मध्यमवर्ग करत आहे.

Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) – User Experience Design & Technology

गॅस सिलेंडरवर मिळते सबसिडी

हे जाणून घ्या कि, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या 12 गॅस सिलेंडरवर केंद्र सरकार कडून सबसिडी दिली जाते. ज्याअंतर्गत लोकांना प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर 200 रुपये दिले जातात. आता पुढील आर्थिक वर्षासाठीही सरकार हे सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही योजना 100% लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार ती आणखी पुढे वाढवू शकते. Budget 2023

Centre to give subsidy of Rs 200 per gas cylinder to PM Ujjwala Yojana  beneficiaries - BusinessToday

9 कोटी लाभार्थ्यांचा झाला फायदा

गेल्या काही वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत याचा भार गरिबांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मे 2021 मध्ये 200 रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली होती. एका आर्थिक वर्षात फक्त 12 सिलेंडरसाठी ही योजना लागू होती. तसेच 9 कोटींहून जास्त लोकांना या योजनेचा फायदा झाला. चालू आर्थिक वर्षासाठी देखील सरकारने 5812 कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे. Budget 2023

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बीपीएल न्यू लिस्ट 2023 (PMUY) » MY HINDI GUIDE

उज्ज्वला योजनेबाबत जाणून घ्या

उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. यासाठी त्यांना 1,600 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. याशिवाय फ्री रिफिल आणि स्टोव्ह देण्याची देखील तरतूद केली गेली आहे. 2016 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. यानंतर 10 ऑगस्ट 2021 रोजी उज्ज्वला 2.0 आणली. ज्याअंतर्गत, वंचित कुटुंबांनाही गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. Budget 2023

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pmuy.gov.in/

हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???