हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मोबाईल आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता मोबाईल, कॅमेरा लेन्स आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत.
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,” देशात मोबाईल फोन स्वस्त केले जातील. त्याचप्रमाणे त्यांच्या कॉम्पोनंट्सवरील आयात शुल्कातही सवलत देण्यात येईल. त्याबरोबर एलईडी टीव्ही देखील स्वस्त करण्याची घोषणा केली गेली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम-आयन बॅटरीवरील आयात शुल्क देखील कमी होणार आहे. ज्यामुळे आता देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती देखील स्वस्त होणार आहेत. याशिवाय देशातील सायकलच्या किंमतीही कमी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. Budget 2023
संसदेत दिलेल्या आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या की,”अप्रत्यक्ष कर प्रस्तावांचा उद्देश निर्यातीला चालना देणे, देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, देशांतर्गत मूल्यवर्धन वाढवणे, हरित ऊर्जा आणि गतिशीलतेला प्रोत्साहन देणे हे आहे. याव्यतिरिक्त कापड आणि कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत आयात शुल्कही 21 वरून 13 पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.” Budget 2023
Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/y1M7DIh6Wv#Hellomaharashtra @nsitharaman #Budget2023
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 1, 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://youtube.com/live/uMj699Dopoo
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता