हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. हे अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी शेवटचे देखील ठरू शकते. कारण, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपऐवजी केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले तर पुढील वर्षे अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करण्याची जबाबदारी नव्या सरकारकडे येईल. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तसेच या अर्थसंकल्पात मोदी सरकार तीन महत्त्वाच्या घोषणा करतील, असाही अंदाज बांधला जात आहे. या तीन घोषणा कोणत्या असतील, आपण जाणून घेऊयात.
केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Budget 2024)
1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी पगारवाढीसंदर्भात मागणी करत होते. अखेर या मागणीला विचारात घेऊन एक फेब्रुवारी रोजी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ करू शकते. केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर 18 हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगार 26 हजार रुपये होऊ शकतो.
8 व्या वेतन आयोगाची घोषणा
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (Budget 2024) सरकार आठव्या वेतन आयोगाची घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने असा निर्णय घेतल्यास छोट्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देखील पगारात वाढ होईल. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना केंद्र सरकार आठवा आयोग लागू करू शकते असा अंदाज बांधला जात आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर होईल.
डीए एरिअर वाढ
केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवत असते. परंतु कोविड काळापासून सरकारने महागाई भत्ता वाढवलेला नाही. त्यानंतर 1 जुलै 2021 साली सरकारने भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ केली. मात्र त्यावेळी महागाई भत्ता 17 टक्के असा होता. तो 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्यात आला. तेव्हापासून ते आजवर कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांची डीएची थकबाकी सरकारकडे आहे. आता ही सरकार यंदा भरून काढेल, असे म्हणले जात आहे. डीए एरिअर वाढ केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवत असते. परंतु कोविड काळापासून सरकारने महागाई भत्ता वाढवलेला नाही. त्यानंतर 1 जुलै 2021 साली सरकारने भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ केली. मात्र त्यावेळी महागाई भत्ता 17 टक्के असा होता. तो 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्यात आला. तेव्हापासून ते आजवर कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांची डीएची थकबाकी सरकारकडे आहे. आता ही सरकार यंदा भरून काढेल, असे म्हणले जात आहे.