मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थ संकल्प मांडला आहे. चार महिन्यावर विधानसभेच्या निवडणूका आल्याने हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. या अर्थ संकल्पात ग्रामीण महाराष्ट्राला झुकते माप देण्यात आले असून ग्रामीण भागात उद्योग उभारणी करण्यात या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान अर्थ संकल्प सादरी करणाआधीच फुटला असल्याचा आक्षेप विधान सभेत अजित पवार यांनी नोंदविला त्या वेळी सभागृहात गोंधळ माजला आणि विरोधकांनी सभात्याग केला.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थ संकल्प मांडत असताना त्या अर्थ संकल्पातील काही बाबी मांडण्या आधीच ट्विटरवर पडत असल्याचा आक्षेप अजित पवार यांनी घेतला. त्यावर सभागृहात मोठा गदारोळ देखील झाला. सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थ संकल्पाचे भाषण सुरु असतानाच अजित पवार यांनी अर्थ संकल्पावर हरकत घेतल्याने सभागृहात एकच गोंधळ माजला. तर अजित पवार यांची हि हरकत विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी अर्थसंकल्पाचे वाचन चालू असतानाच सभा त्याग केला.
मुख्यमंत्री या विषयावर बोलण्यासाठी उभे राहिले असता. त्यांनी अर्थसंकल्प कोणत्याही प्रकारे फुटला नाही. तंत्रज्ञानाच्या वेगवान हालचालीमुळे विरोधकांना या बाबत संशय येणे साहजिक आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीच घटना घडली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.