हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणजे बुलडाणा शहराजवळ असलेल्या राजूर घाटात चाकूचा धाक दाखवून आठ जणांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी १४ जुलैच्या रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. मुख्य म्हणजे, या घटनेमुळे पुन्हा एकदा महाष्ट्रातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, १४ जुलैच्या दुपारी बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी संबंधीत महिला आपल्या कुटुंबासोबत गेली होती. मात्र याच वेळी आठ जणांनी महिलेला चाकूचा धाक दाखून तिच्याकडील सर्व रोख रक्कम लुटली. पुढे यावरच न थांबता या ८ नराधमांनी महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
यानंतर आरोपी ज्यावेळी पळ काढण्यासाठी पळाले तेव्हा महिलीने त्यांचा पाठलाग केला. यावेळी ते मोहेगाव येथे गेल्याची माहिती तक्रारदार महिलेने पोलिसांना दिली आहे. संबंधीत प्रकरणाची तातडीने कारवाई करत पोलिसांची आरोपी राहूल राठोड याला अटक केले आहे. तसेच इतर फरार झालेल्या आरोंपीची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान हा सर्व प्रकारानंतर रात्री महिलेने स्व:त पोलीस ठाण्यात येऊन आरोपीं विरोधात तक्रार नोंदवली. यानंतर प्रकरणाची माहिती मिळताच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात येऊन महिलेची भेट घेतली. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात येण्याचे आश्वासन त्यांनी महिलेला दिले. सध्या या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांच्या मनात राजूर घाटात जाण्याची भिती निर्माण झाली आहे. बुलडाणामध्ये घडलेल्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षितेच्या प्रश्नाने पुन्हा तोंड वर काढले आहे. आता इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रात देखील महिलांच्या अत्याचारासंबंधीत घटनांमध्ये वाट होताना दिसत आहे. मात्र याकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.