बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या महिलेला एक लहान मुलगीसुद्धा आहे. हि दुर्दैवी घटना मलकापूर पांग्रा याठिकाणी घडली आहे. या महिलेने आत्महत्या (Sucide) करण्याअगोदर स्वतःच्या 10 वर्षीय मुलीला ही विषारी औषध पाजल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या मुलीवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
10 महिन्यांच्या गौरीला विषारी औषध पाजल्याची शंका
बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील निलेश वरकड हा युवक सुरत येथे कामाला होता. यादरम्यान त्याची तेथील दिपाली नामक तरुणीसोबत ओळख झाली. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर या दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. त्यानंतर दोघेही मलकापूर पांग्रा येथे राहण्यास आले होते. यानंतर त्यांना एक मुलगी झाली. सध्या निलेश आणि दिपाली शेतातील घरात वास्तव्यास होते. यादरम्यान काल रात्री दुपारी दिपालीने आपल्या 10 महिन्यांच्या गौरीला विषारी औषध पाजले आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली.
मुलीची प्रकृती स्थिर, उपचार सुरु
मुलगी गौरीला अत्यावस्थ स्थितीत मेहकर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मात्र दिपालीने आत्महत्या (Sucide) का केली? हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???