धक्कादायक ! लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लग्नासाठी मुलगी देण्यास नकार देत असल्याने मुलांकडील मंडळीने मुलीच्या काका आणि वडिलांवर हल्ला केला आहे. यामध्ये मुलीच्या काकाच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील जामोद या गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी नवऱ्या मुलासह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी सध्या फरार आहे.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सगळी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत गेल्या अनेक दिवसापासून शेजारी राहणारे मुलाला लग्नासाठी मुलगी देण्यास तयार नव्हते, त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून या मुद्द्याला घेऊन दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि त्यामध्ये मुलीच्या काकाला आपला जीव गमवावा लागला. तर या मारामारीत जखमी झालेल्या मुलीच्या वडिलांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी रसूल यांची मुलगी ही दहावीत शिकते. शेजारी राहणारा आरोपी शेख सद्दाम हा नेहमीच तिला त्रास देत होता. सद्दामला मुलीचे काका मृतक नूरखान यांनी त्याला समजावून सांगितले होते. तर सद्दाम याचे वडील सद्दामच्या लग्नाकरिता मुलीच्या वडीलाकडे हाथ मागण्यासाठी गेले होते. परंतु मुलीच्या वडिलांनी मुलगी देत नाही असे सांगितले. लग्नास नकार दिल्याने सद्दाम म्हणाला की, तुम्ही मुलगी देत नाही तर मुलीला पळवून नेल्यानंतर मुलगी देसाल काय ही घटना दहा-बारा दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर मुलीच्या काकांना चर्चेसाठी घरी बोलावण्यात आले. त्यांनी नकार दिल्याने व मागील वादाचे कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला आणि मृत नूरखान यास सद्दामने घरामध्ये मारहाण केली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.