हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रोजेक्ट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे. त्यामुळे नुकतीच नरेंद्र मोदी यांनी आणखीन 3 बुलेट ट्रेनच्या नवीन मार्गांची घोषणा केली आहे. यातील एक मार्ग उत्तर, एक मार्ग दक्षिण आणि तिसरा मार्ग पूर्व भारतात असणार आहे. खास म्हणजे, 2026 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावेल, हा विचार करून बुलेट ट्रेन मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. भविष्यात तर देशातील दहा मार्गांवर बुलेट ट्रेन धावणार आहेत. यापैकी एक मार्ग मुंबई-नागपूर असा असेल. जो नाशिक मार्गे जाईल. ही बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येईल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सादर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या मार्गांवरील धावणाऱ्या तीन बुलेट ट्रेनची माहिती देण्यात आली आहे. तर भविष्यामध्ये देशात दहा मार्गांवर बुलेट ट्रेन धावतील अशी योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसंदर्भातील 6 मार्गांच्या चाचपणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर 2026 पर्यंत मुंबई-अहमदाबाद मालेगाव बुलेट ट्रेन धावेल, असे विजन डोळ्यासमोर ठेवून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे.
मार्ग कसा असणार? (Bullet Train)
सध्याच्या घडीला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचे बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्परेशनकडून केले जात आहे. यात देशाच्या विकासात आणखीन भर घालण्यासाठी सरकारचा 6 मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस आहे. परंतु सहापैकी दोन मार्गांच्या प्रकल्पांचे काम निवडणुकीनंतर सुरू होणार आहे. आता ज्या बुलेट ट्रेनची (Bullet Train) चाचणी सुरू आहे त्यात मुंबईहून जाणारे एकूण दोन मार्ग आहेत. इतर मार्गांच्या बांधणी संदर्भात जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यात दिल्ली-अमृतसर, हावरा-वाराणसी-पाटणा, दिल्ली-आग्रा-लखनऊ-वाराणीस, मुंबई-नाशिक-नागपूर, दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद मार्गाचा समावेश आहे.
तर समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हावरा-वाराणसी आणि दिल्ली-अमृतसर मार्गावरील बुलेट ट्रेनचे (Bullet Train) काम सुरू करण्यात येईल. डीपीआर हे काम फक्त सात ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण करेल. परंतु या कामाला निवडणुकीनंतर सुरुवात होईल असे दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग 508 किमी लांबीचा असेल. तसेच या मार्गांमध्ये पहिल्यांदा समुद्राखालील बोगद्यांमधून बुलेट ट्रेन कॉरिडोअर तयार करण्यात येईल .