हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामणी भागात ग्रामदेवतांच्या यात्रा सुरु आहेत. या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत, कुस्तीसह अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मलकापुरच्या मायरा युवराज पाटील यांच्या बैलगाडीने 51 हजार 111 पहिले बक्षीस पटकावले.
जुगाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत तब्बल 100 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या सर्व बैलगाडा मालकांना मानाची ढाल आणि बक्षीस देण्यात आले. यावेळी बैलगाडा शर्यतीचे नियोजन लोकनियुक्त सरपंच नितीन निकम, उपसरपंच सुनिल निकम, युवा उद्योजक सर्जेराव साळुंखे, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांचे संचालक शशिकांत निकम, ग्रामपंचायत सदस्य सतिश निकम, निवास सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैलगाडा शर्यतीमध्ये गुरसाळे येथील रॉयल कारभार सौरभ जाधव यांची बैलगाडी 41 हजार 111 रूपयाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तर तृतीय क्रमांक नडशी येथील अमित पाटील यांच्या बेलगाडीने 31 हजार 111 पटकावले. तर 21 हजार 111 चतुर्थ क्रमांकाचे मुढेचे अदविका अमित जमाले ठरले तर 11 हजार 111 पाचव्या क्रमांकाचे हिंगनोळेचे बुलेट शंभु ग्रुपनी पटकावले, विजेत्या सर्व बैलगाडा मालकांना मानाची ढाल आणि बक्षीस देण्यात आले. या बैलगाडा शर्यतीसाठी यात्रा कमेटीच्या योग्य नियोजन करण्यात आले होते. यात्रा कमेटीच्या वतीने बक्षीस दात्यांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.