सांगली प्रतिनिधी |पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गुंडांच्या टोळक्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची तक्रार शीला निशिकांत गोंधळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी दोघेजण परागंदा झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता सुरु असतानाही संशयितांनी हातात कोयत्यासारखे हत्यार घेऊन दहशत माजवली आहे. या परिसरात यापूर्वी अनेकवेळा भांडणाचे प्रकार घडले असून नेहमीच्या भांडणाला येथील नागरिक वैतागले आहेत. याचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी जोरदार मागणी या परिसरातून होत आहे.
‘पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शैलेश सुतार, स्वप्नील यादव, अभय संकपाळ आणि एक बाल अपचारी अशा चौघांनी २७ रोजी रात्री अचानकपणे घरात घुसून सागर व आकाश कुठे आहेत असे विचारूत तक्रारदार महिलेला आणि तिच्या पतीला शिवीगाळ व धक्काबुक्की करून शैलेश याने लोखंडी कोयता हातात घेऊन दहशत निर्माण केली. घरातील भांडयांची फेकाफेकी केली व ते सर्वजण निघून गेले. प्रतीक विटेकर हा त्याच्या घरासमोर बसला असता त्यालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व पुनः शिवीगाळ करून निघून गेले. यावेळी त्यांनी आणलेली दुचाकी नवीन असून त्याच्यावर नंबर नसल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे. यातील शैलेश सुतार व स्वप्नील यादव या दोघांना गस्ती पथकाने रात्री सिद्धार्थ परिसरात अटक केली. अटक केलेल्याना आज-सोमवारी न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. यातील उर्वरित दोघांना अजून ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच यांनी अजून असा प्रकार कुठे केला आहे काय याचीही चौकशी करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता सुरु असतानाही संशयितांनी हातात कोयत्या सारखे हत्यार घेऊन दहशत माजवली आहे.या परिसरात यापूर्वी अनेकवेळा भांडणाचे प्रकार घडले असून नेहमीच्या भांडणाला येथील नागरिक वैतागले आहेत. याचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी जोरदार मागणी या परिसरातून होत आहे.
Attachments area