नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण 7 महिने बंद असलेले सिनेमा हॉल आता हळू हळू सुरू होत आहेत. मात्र, कोरोनाच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांमुळे सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहण्याचा मार्ग देखील पूर्वीच्या तुलनेत पूर्णपणे बदलला आहे. आता चित्रपट गृहाच्या आत स्वच्छता, साफसफाई आणि सामाजिक अंतर या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. थिएटर सुरू झालेले असूनही प्रेक्षक अद्यापही कोरोनाच्या भीतीने गैरहजर आहेत. अशा प्रकारे थिएटर्स प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स आणत आहेत. दरम्यान, आयनॉक्स मूव्हीजने (Inox Movies) एक वेगळी योजना सुरू केली आहे, ज्यात ग्राहक संपूर्ण हॉल अवघ्या 2,999 रुपयांमध्ये बुक करून चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.
प्रायव्हेट स्क्रीनिंग सुरू झाले
मीडिया रिपोर्टनुसार, आयनॉक्स मूव्हीजने आपले प्रायव्हेट स्क्रीनिंग सुरू केले आहे. कंपनीकडून एक ऑफर आली आहे की, आता आपण आपले प्रायव्हेट थिएटर बुक करू शकता. या ऑफरनुसार आपण फक्त 2,999 रुपयांमध्ये संपूर्ण थिएटर बुक करू शकता आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि मित्रांसह चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. या ऑफरमध्ये कमीतकमी दोन लोकं असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त संख्या थिएटरच्या पूर्ण क्षमतेच्या 50 टक्के असेल. प्रेक्षक आपल्या सोयीनुसार किंवा वेळ आणि दिवसानुसार हे बुकिंग करू शकतात.
Inox च्या प्रत्येक थिएटरमध्ये हि सुविधा असेल
या ऑफरनुसार, आपल्याला नवीन चित्रपट किंवा जुना चित्रपट यांपैकी कोणता पहायचा आहे ते ठरवू शकता. आपण खास स्क्रीनिंग बुक करून आपले खास प्रसंग साजरे करू शकता. Inox चा दावा आहे की ते पूर्णपणे सुरक्षित आणि स्वच्छ असेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील Inox च्या प्रत्येक थिएटरमध्ये प्रायव्हेट स्क्रिनिंगची सुविधा असेल. बुकिंगसाठी कंपनीला ईमेल पाठवून आपली योजना सांगावी लागेल. त्यानंतर कंपनी आपल्या इच्छेनुसार सर्व मॅनेजमेंट करेल.
Inox चे डायरेक्टर सिद्धार्थ जैन यांच्या म्हणण्यानुसार ज्याला कोणाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल ते संपूर्ण थिएटर बुक करू शकतील. कोरोनामुळे झालेल्या बदलांनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले गेले आहे. आता ग्राहक सुरक्षिततेची चिंता न करता आपल्या कुटुंबियांसह किंवा मित्रांसह चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. थिएटरमध्ये केवळ आपलेच लोक असल्यामुळे त्यांना सामाजिक अंतराबद्दल चिंताही वाटणार नाही.
गृह मंत्रालयाने नुकतेच कंटेनमेंट झोनबाहेरील असलेले सिनेमा हॉल, थिएयर आणि मल्टिप्लेक्स 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.