औरंगाबाद : दोन हातातील घड्याळ व मोबाईल ऑनलाईन ऑर्डर करून फक्त दहा मिनिटात 97 हजाराचे पार्सल एक्सचेंज करून फसवणाऱ्या जोडपे विरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मयुरबन कॉलनी गादीया विहार परिसरात घडला होता.
हाती आलेल्या माहितीनुसार, अमेय कमठाणकर या बनावट नावाने मयुरबन कॉलनी परिसरातील व्यक्तीने दोन मोबाईल आणि दोन हातातील घड्याळ याची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. ऑर्डरप्रमाणे डिलिव्हरी बॉय संदीप पुंजाराम बुवा हा पार्सल घेऊन आला. पार्सल घेतल्यानंतर अमेयने खिशातून 40 हजार रुपये काढून दिले. पैसे मोजत असताना एक तरुणही पार्सल घेऊन गेली. दरम्यान एकूण बिल 97 हजार 898 रुपये झाले असता केवळ 40 हजार रुपये दिल्याने संदीपने उर्वरित रकमेची मागणी केली.
अमेयने पैशाची मागणी केली असता पार्सल वापस आणून दिले. त्यानंतर संदीपने 40 हजाराची रक्कम परत दिली. पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय परत गेला. 12 जुलैला ऑफिसमध्ये पार्सल तपासले असता पार्सलमध्ये भांडे व कपडे धुण्याच्या साबणाची निघाल्या याप्रकरणी डिलिव्हरी बॉय संदीप बुवा यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.