घरफोडी करणाऱ्यास दीड वर्षानंतर केले अटक; हिमायत बाग परिसरातील घटना

0
130
Gharfodi
Gharfodi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंंगाबाद | हिमायतबाग परिसरात घरफोडी करणाऱ्यास दीड वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. हिमायतबाग परिसरातील मौलाना आझाद सोसायटीत राहणारे सय्यद अयाज सय्यद फजलउल्ला हाश्मी (वय 31) यांचे कुटूंबीय 2 नोव्हेंबर 2019 रोजी धार्मीक कार्यक्रमासाठी लातूर जिल्हयातील निलंगा येथे गेले होते.

सय्यद अय्याज हाश्मी हे एकटेच घरी होते. सय्यद अय्याज हाश्मी यांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याकडे जावून पाहिले असता, चोरट्याने दरवाजा तोडुन कपाटातील ७० हजार ८५० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष उर्फ मुक्या उर्फ बांग्या गणेश रामफळे (वय 22,रा.जयभीमनगर, टाऊन हॉल)असं या चोरट्याचं नाव आहे. घराच्या मागचा दरवाजा तोडून 70 हजार 850 रुपये किंमतीचे दागिने चोरणाऱ्यास अठरा महिन्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले आहेत. 7 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सय्यद अय्याज हाश्मी हे घराला कुलूप लावून मित्राला भेटण्यासाठी आझाद चौकात गेले असता, रात्री पवणेदहा वाजेच्या सुमारास घरी आले. आणि त्यांनी घराचे लॉक उघडले आणि जीण्यातून कोणाचा तरी पळण्याचा आवाज आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here