शहरात भर दिवसा घरफोडी ! प्रसूतीसाठी रुग्णालयात गेलेल्या दाम्पत्याचे फोडले घर

0
45
gharfodi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पत्नीला प्रसूतीकळा येत असल्याने पती- पत्नी दोघेही रुग्णालयात गेले.मात्र हीच संधी साधून चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, लॅपटॉप,टीव्ही मिक्सर लंपास केले.विशेष म्हणजे एका खेपेत एवढे साहित्य नेता न आल्याने चोरट्याने कपडे बदलून येऊन पुन्हा त्याच घरातील साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार देवळाई परिसरातील कीर्तिका रेसिडेन्सीमध्ये घडला. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. चिकलठाणा पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असलेले शालीकराम मैनाजी चौधर वय-29 (रा. कीर्तिका रेसिडेन्सी, देवळाई परिसर) यांच्या पत्नीला प्रसूतीकळा होत असल्याने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ते रुग्णालयात गेले होते. व ते परत संध्याकाळी पाच वाजता घरी आले तेंव्हा घराच्या दरवाज्याला कुलूप न्हवते व दार उघडे होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता किचनच्या बेसिन मध्ये कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. तर घरातील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते.त्यांनी शोकेसमध्ये पाहिले असता त्यामधील एक सात ग्राम वजनाची व एक पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी व सूमारे 80 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास झाल्याचे निदर्शनास आले. हॉल मधील स्मार्ट टीव्ही, मिक्सर, लॅपटॉप व बॅग असा साहित्य चोरीला गेल्याचे समोर आल्यावर त्यांनी तातडीने या बाबत पोलिसांना माहिती दिली. चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने घटनस्थळाची पाहणी करीत श्वान पथकाला पाचारण केले मात्र श्वान काही अंतरावर जाऊन जागेवरच घुटमळला. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दुचाकीवरून आलेला चोरटा स्पष्ठ दिसून येत आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पुन्हा कपडे बदलून मारली दुसरी खेप

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली तेंव्हा चोरटा दोन वेळा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाहिल्या वेळेस चोरटा जेंव्हा आला होता तेंव्हा त्याने पूर्ण शर्ट-पॅन्ट घातली होती. पहिल्या चक्कर मध्ये त्याने मौल्यवान वस्तू आणि टीव्ही लंपास केली तर दुसऱ्या वेळेस चोरटा जेंव्हा आला तेंव्हा त्याने शॉर्ट पॅन्ट आणि टी-शर्ट घातल्याचे फुटेज मध्ये दिसत आहे.चोरटा ज्या मोपेड वरून आला होता.त्या वाहनांचा क्रमांक मात्र स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात राहिवाश्यामध्ये मात्र मोठी दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here