बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीचा युवकावर अॅसिड हल्ला, ती मुलगी कोण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | नगर जिल्हा कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत असतो. मग ती राजकीय असो, सामाजिक असो अथवा गुन्हेगारी विश्वातील असो. दोन दिवसापूर्वी नवरा सासरी घेऊन जाण्यासाठी आला असता त्याचा राग येऊन बायकोने नवऱ्याला विष पाजून ठार मारण्याची घटना कर्जत येथे घडली होती तर आंतरजातीय विवाह केला म्हणून निघोज येथील घटना ताजी असतानाच नगर मध्ये एका युवकावर ॲसिड हल्ला करण्यात आलाय.

नगर शहरातील प्रेमदान चौकातील एका कॅन्टीनमध्ये हल्ला करण्यात आलाय. अल्ला करणाऱ्याने बुरखा परिधान केला होता त्यामुळे त्याची ओळख पटली नाही. मात्र हा हल्ला कोणी केला आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. हल्ला झालेला तरुण शेख अमीर रशीद हा गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत तोफखाना पोलीस तपास करीत आहेत. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने अजून कोणत्याही जबाब त्यांनी दिला नसल्याने पोलीस सध्या अज्ञात इसमाचा शोधात आहेत. हल्ला नेमका मुलाने केला का मुलीने केला याबाबत पोलिस तपास करीत असून सोशल मीडियावर मात्र याची जोरदार चर्चा होत आहे

Leave a Comment