हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर सेकंड हँड कारचा व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकेल. जो सध्या चांगला फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. याद्वारे अनेक लोकं लाखो रुपयांची कमाई देखील करत आहेत. जर आपणही सेकंड हँड कारचा व्यवसाय सुरु केला तर याद्वारे चांगले पैसे कमावू शकाल.
सध्याच्या काळात बाजारात चारचाकी वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत अनेकदा लोकं आपल्या गाड्या अपग्रेड करतात. मात्र याबरोबरच आजकाल सेकंड हँड कारला खूप मागणी देखील आहे. जर आपण जुन्या गाड्या खरेदी करून इतरांना विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर यातून भरघोस कमिशन मिळू शकेल.
व्यवसाय कसा सुरू करायचा ते जाणून घ्या
सेकंड हँड कारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एखाद्या ठिकाणी ऑफिस उघडावे लागेल. यानंतर त्याची जाहिरात करावी लागेल. इथे आपल्याला जुन्या गाड्या खरेदी करून त्या जास्त किमतीत विकून मोठा नफा कमवता येऊ शकेल. त्याच प्रमाणे सेकंड हँड कार खरेदी करणारा खरेदीदार आणि कार विकणारा विक्रेता यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणूनही काम करता. याद्वारे मोठे कमिशनही मिळू शकेल. Business Idea
अशा प्रकारची जागा निवडा
सेकंड हँड कारचा व्यवसायासाठी अशी जागा निवडावी लागेल जिथे वाहनांशी संबंधित कोणत्याही प्रकारचे काम आधपासूनच केले जात असेल. अनेक शहरांमध्ये कार शोरूम, गॅरेज, कार धुण्याची दुकाने इत्यादी एकाच ठिकाणी असतात. जर अशा ठिकाणी आपले ऑफिस उघडले तर ग्राहक मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. Business Idea
किती कमाई होईल???
आजकाल अनेक लोकं आपल्या जुन्या गाड्या फक्त चांगल्या कंडीशनमध्येच विकतात. यामुळे आपण नेहमी अशा लोकांकडूनच गाड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांच्या दुरुस्तीवर आपल्याला जास्त खर्च करावा लागणार नाही. या व्यवसायामध्ये जर एका गाडीद्वारे 25-30 हजार कमिशन मिळाले तर दर महिन्याला 4-5 गाड्या विकूनही एक लाख रुपयांहून जास्त रुपये मिळतील. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण