Business Idea : LED बल्ब युनिट बसवून मिळवा लाखोंचा नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आजकाल पिवळ्या काचेच्या बल्ब ऐवजी फ्लडलाइट्सच्या एलईडी बल्ब वापरला जातो. त्यामुळे चांगल्या प्रकाशा बरोबरच वीज बिलही कमी येते. तसेच सरकारकडूनही एलईडी बल्बच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच त्यांच्या वाढत्या मागणीमुळे याद्वारे नवीन रोजगार किंवा व्यवसायाच्या संधी देखील निर्माण होत आहेत.

Trying to Solve the L.E.D. Quandary | The New Yorker

जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याचा विचार असाल तर एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. तसेच या व्यवसायामधून आपल्याला दुप्पट नफा देखील मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून यासाठी इन्सेन्टिव्ह देखील दिले जात आहे. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक संस्थाकडून एलईडी बल्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आहे. याद्वारे कमी खर्चात चांगली कमाई होईल. Business Idea

LED Light Bulb Conversion Chart - Lampsone

व्यवसाय कसा सुरू करावा ???

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आधी प्रशिक्षण घ्यावे लागेल.यामध्ये सुरुवातीला एलईडी लाईटची प्राथमिक माहिती, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-चाचणी, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना इत्यादींची माहिती दिली जाईल. Business Idea

बल्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू

एलईडी बल्बच्या तयार करण्यासाठी सोल्डरिंग मशीन, डिजिटल मल्टीमीटर, टेस्टर, सीलिंग मशीन, एलसीआर, मीटर, स्मॉल ड्रिलिंग मशीन, लक्स मीटर यासारख्या लहान मशीन्सची आवश्यकता भासेल. याशिवाय लीड चिप्स रेक्टिफायर मशीन, हीट सिंक डिव्हाईस, मेटॅलिक कॅप होल्डर, प्लास्टिक बॉडी, रिफ्लेक्टर प्लास्टिक, ग्लास, कनेक्टिंग वायर, सोल्डरिंग फ्लक्स देखील लागतील. Business Idea

led bulbs: Latest News & Videos, Photos about led bulbs | The Economic  Times - Page 1

खर्च आणि उत्पन्न

अगदी कमी प्रमाणात एलईडी बल्ब बनवण्यासाठी किमान 50 हजार रुपयांची गुंतवणूक लागेल. तसेच यासाठी आपल्या घरातील एखादा कोपरा देखील पुरेसा ठरेल. हे लक्षात घ्या कि, बल्ब बनवण्यासाठीचे सर्व सामान बाजारात उपलब्ध आहे. एक बल्ब बनवण्यासाठी 50 रुपयांपर्यंत खर्च येतो,जो बाजारात 100 रुपयांना अगदी सहजपणे विकला जाईल. म्हणजेच एका बल्बमध्ये दुप्पट नफा. जर एका दिवसात 100 बल्ब जरी बनवले तरी थेट 5000 रुपये मिळतील. अर्थात दररोज 5000 रुपयांच्या आधारावर, महिन्याला 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :

Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा

इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस

Investment : Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा बँकांच्या FD पेक्षा जास्त व्याज !!!

Mutual Fund द्वारे अशा प्रकारे गुंवणूक करून मिळवून भरपूर रिटर्न !!!

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा

Leave a Comment