हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : आपल्या सेवा जास्तीजास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय पोस्ट ऑफिसकडून या वर्षी आणखी 10,000 पोस्ट ऑफिस उघडले जाणार आहेत. ज्यानंतर देशातील एकूण पोस्ट ऑफिसेसची संख्या 1.70 लाख वर जाईल. या माध्यमातून अनेक सरकारी योजनांचा लाभ लोकांना घरबसल्या दिल्या जातील. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणासाठी 5,200 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या विस्ताराचा फायदा घेऊन आपल्याला चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकेल. Business Idea
हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसकडून अनेक सरकारी योजनांचा लाभ घरोघरी पोहोचवण्याची तयारी केली जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन चांगला नफा मिळवण्याची संधी चालून आली आहे. चला तर मग आज आपण पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी विषयी जाणून घेउयात …
फ्रँचायझी कशी मिळेल ???
पोस्ट ऑफिसकडून 2 प्रकारच्या फ्रँचायझीची ऑफर दिली जाते. यातील पहिला म्हणजे आउटलेट आणि दुसरे म्हणजे एजंट फ्रँचायझी. जे एजंट पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरी घरोघरी पोहोचवतात त्यांना एजंट फ्रँचायझी म्हंटले जाते. पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेण्यासाठी आपल्याला 5,000 जमा करावे लागतील. यासाठी पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तसेच जर आपल्याला फ्रँचायझी देण्याचा निर्णय घेतला गेल्यास आपल्याला पोस्ट ऑफिसमबरोबर एका सामंजस्य करार करावा लागेल. Business Idea
फ्रँचायझी कोणाला घेता येऊ शकेल ???
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या फ्रँचायझीसाठी अर्ज करता येईल. मात्र यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त शाळेतील 8वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. Business Idea
खर्च आणि कमाई किती असेल ???
वर सांगितल्याप्रमाणे पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी घेण्यासाठी 5,000 रुपये खर्च करावे लागतील. यानंतर कमिशनद्वारे पैसे मिळतील. कमिशनबाबत बोलायचे झाल्यास, रजिस्टर्ड आर्टिकलच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीडपोस्टवर 5 रुपये, 100-200 रुपयांच्या मनी ऑर्डरवर 3.50 रुपये आणि 200 रुपयांच्या वरच्या मनी ऑर्डरवर 5 रुपये कमिशन मिळेल. तसेच जर आपल्याकडून दर महिन्याला स्पीडपोस्ट आणि रजिस्ट्रीची 1,000 पेक्षा जास्त बुकिंग झाली तर 20 टक्के अतिरिक्त कमिशन दिले जाईल. याशिवाय टपाल तिकीट, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर यांच्या विक्रीवर 5% कमिशन मिळेल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Franchise_Scheme.aspx
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा
PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या
ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा