Business Idea : हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : बाजारात वर्षभर जवळपास सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. मात्र काही भाज्यांचा विशिष्ट हंगाम असतो. तसे पहिले तर हिवाळ्यामध्ये इतर ऋतूंच्या तुलनेत भाज्यांमध्ये जास्त विविधता असते. या काळात भूक जास्त लागत असल्यामुळे लोकांकडूनही खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, ज्याच्या परिणामी भाज्यांना भरपूर मागणी असते.

आज आपण अशाच काही भाज्यांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या लागवडीद्वारे या हंगामात मोठा नफा मिळवता येऊ शकेल. हे लक्षात घ्या कि, यातील काही भाज्या कोणत्याही हंगामात पिकत असल्या तरीही ज्या वेळी त्यांचे उत्पादन कमी होते, अशावेळी त्याचा थेट परिणाम नफ्यावर होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात अशा भाज्यांची लागवड करून भरपूर पैसे मिळवता येतील.

मोहरी लागवड पद्धत

मोहरीची लागवड

मोहरीची लागवड केल्याने दोन फायदे मिळतील. जेव्हा मोहरीचे पीक पूर्णपणे पिकते तेव्हा ते विकून पैसे कमवता येतील. त्याच वेळी, हिवाळ्यात हिरव्या भाज्यांसाठी मोहरीच्या पानांना खूप मागणी असते. म्हणूनच मोहरीची पाने विकून चांगले पैसे मिळवता येतील. मोहरीच्या भरपूर उत्पन्न देणाऱ्या जातींमध्ये क्रांती, माया, वरुण इत्यादी प्रमुख जाती आहेत. मोहरी लागवडीसाठी चिकणमाती सर्वात योग्य मानली जाते. तसेच बागायती क्षेत्रात मोहरीच्या पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी 5-6 किलो बियाणे वापरावे. याद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकेल. Business Idea

Growing Methi in Pots, Terrace, Indoors from Seed | Gardening Tips

मेथीची लागवड

मोहरीप्रमाणेच मेथीची लागवड करून आपल्या दुप्पट फायदा मिळू शकेल. याशिवाय मेथीची लागवड करणे अतिशय सोपे देखील आहे. एकदा मेथी पेरल्यानंतर आपल्याला नियमितपणे पाणी द्यावे लागेल. पेरणीनंतर 25-30 दिवसांनी त्याची पाने भाज्यांसाठी तयार होतात. मेथी अनेक वेळा कापून विकता येतील. सिंचनानंतर मेथीला नवीन पाने येतात. अशा प्रकारे, जोपर्यंत त्याची पाने भाज्यांसाठी योग्य राहतील तोपर्यंत त्याची कापणी करता येईल. तसेच त्यावर फुले आल्यानंतर काही काळ काढणी न करता पाणी दिल्यास मेथीचे पीकही तयार होते. औषधी गुणधर्मामुळे मेथीची पाने आणि मेथी दाण्यांना देखील बाजारात भरपूर मागणी आहे. Business Idea

Spinach Cultivation: पालक की खेती के नए तरीकों से पाएं 15 दिनों में -

पालकाची लागवड

हे जाणून घ्या कि, पालक हे थंड हवामानात घेतले जाणारे पीक आहे. मात्र योग्य वातावरण तयार करून इतर कोणत्याही हंगामात त्याची लागवड करता येते. हिवाळ्यात त्याचे उत्पादन उर्वरित हंगामाच्या तुलनेत अनेक पटीने वाढते. पालकाच्या प्रगत जातींमध्ये पंजाब ग्रीन आणि पंजाब सिलेक्शन हे जास्त उत्पादन देणारे वाण मानले जातात. ज्याची एकदाच लागवड करून आपण अनेक वेळा झाडाची पाने कापून विकू शकतो. कारण हिवाळ्यात ते पुन्हा वाढायलाही जास्त वेळ लागत नाही. त्याच वेळी, या काळात बाजारात त्याला खूप मागणी असल्यामुळे चांगला नफा देखील मिळू शकेल. Business Idea

वांगे पिकाचे नियोजन – कृषिसमर्पण

वांग्याची लागवड

वांग्याची लागवड करण्यासाठी आधी त्याची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात, यानंतरच ते लावले जातात. आपल्याला बाजारात वांग्याची रोपे सहजपणे मिळू शकतील किंवा ही रोपे घरीही तयार करता येतील. हे लक्षात घ्या कि, 4-5 आठवडे जुनी झाल्यानंतर वांग्याची झाडे शेतात लावली जातात. मात्र ते लावताना रोपांमधील अंतराची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यांची लागवड किमान एक ते दीड फूट अंतरावर करावी. सलग रोपे लावल्याने वांगी तोडणे सोपे जाईल. वांग्यामध्ये पुसा पर्पल लवंग, पुसा पर्पल क्लस्टर, पूजा क्रांती, मुक्तकेशी अन्नामलाई, बनारस जेट इत्यादी प्रगत जाती मानल्या जातात. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर