हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Business Idea आजकाल अनेक लोक हे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याला प्राधान्य देतात. कारण नोकरीतून त्यांना जास्त पगार मिळत नाही. त्याचप्रमाणे पूर्ण वेळ नोकरीमध्ये द्यावा लागतो. त्यामुळे अगदी छोट्या प्रमाणात का होईना पण आपला स्वतःचा व्यवसाय असावा. असे अनेक लोकांना वाटते. परंतु हा व्यवसाय करताना त्या व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे व्यवसायाची निवड करताना बाजारामध्ये या व्यवसायाला किती मागणी आहे. आपण जर हा व्यवसाय सुरू केला तर त्यातून आपल्याला किती इन्कम होईल? या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला व्यवसाय सुरू करावा लागतो.
परंतु तुम्ही जर आधीच सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास करून अगदी छोट्या गुंतवणुकीत देखील व्यवसाय सुरू केला, तरी त्यातून तुम्हाला खूप चांगली कमाई मिळू शकते. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाची माहिती सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागेल. आणि तुम्हाला आयुष्यभर पैसा कमावता येणार आहे. हा व्यवसाय तुम्ही भारतीय रेल्वेसोबत करू शकता. त्यामुळे ही तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
भारतीय रेल्वेसोबत करा हा व्यवसाय | Business Idea
भारतीय रेल्वे ही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वेचे प्रवास करताना तिकीट घ्यावे लागते. हा व्यवसाय तिकिटाशी संबंधित आहे. तुम्ही आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिटे खरेदी करू शकता. आणि तिकिटांची विक्री करून त्याचे चांगले कमिशन देखील मिळू शकतात.
म्हणजेच तुम्ही आयआरसीटीसी यांच्या माध्यमातून तिकीट देण्यासाठी तिकीट एजंट बनू शकता. यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन तिकीट एजंटसाठी अर्ज करावा लागेल. यामध्ये तुम्ही तिकीट एजंट बनून प्रवाशांसाठी तिकीट बुक करून चांगली कमाई करू शकता.
या व्यवसायात गुंतवणूक म्हणजे तुमच्याकडे केवळ लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ तिकीट एजंट म्हणून हा व्यवसाय सुरू करू शकता. यातून तुम्हाला खूप चांगली कमाई येईल. आणि आयुष्यभर तुम्हाला पैसे कमवता येतील.
महिन्याला किती कमाई होईल ?
तुम्ही आयआरसीटीसी तिकीट एजंट झाल्यानंतर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यामध्ये कमीत कमी महिन्याला पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता. या व्यवसायामध्ये काही तिकीट बुकिंग कराल त्यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही. या व्यवसायात तुम्हाला प्रत्येक तिकिटावरती वेगळे कमिशन मिळते. आणि ते कमिशन जवळपास 20 टक्क्यांपर्यंत असते. म्हणजे तुम्ही जर एसी क्लासिकेट बुक केलं, तर प्रत्येक बुकिंग वर तुम्हाला 40% कमिशन मिळते. अशा प्रकारे तुम्ही अगदी घर बसून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.