हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business ideas : आजकाल अनेक लोकं नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. अनेक सुशिक्षित लोकांचा कल देखील शेतीकडे वाढतो आहे. सध्याच्या काळात पारंपारिक पिके घेण्याऐवजी औषधी वनस्पती, फळे आणि फुले किंवा लाकूड देणाऱ्या रोपांची लागवड केली जात आहे. जर तुम्ही देखील शेती करण्याबाबत विचार करत असाल तर सागवानाची शेती करा. हे लक्षात घ्या कि, सागवानाच्या शेतीसाठी पाणी कमी लागते. याद्वारे कमी खर्चात आणि कमी मेहनतीमध्ये भरपूर उत्पन्न मिळते. मात्र यापासून प्रत्यक्ष कमाई सुरु होण्यासाठी किमान 12 वर्षे वाट पहावी लागेल. मात्र, या 12 वर्षांनंतर एक एकर सागवानाद्वारे आपल्याला भरपूर पैसे मिळतील.
या लाकडाची सर्वांत महत्वाची बाब म्हणजे सागवान लाकडाला बाजारात भरपूर मागणी आहे. सध्या भारतात सागवान लाकडाच्या एकूण वापरापैकी फक्त 5 टक्केच लाकूड उपलब्ध आहे. एका अंदाजानुसार, भारताला दरवर्षी 180 कोटी घनफूट सागवान लाकडाची गरज असते, मात्र वर्षाला फक्त 90 कोटी घनफूट सागवान लाकूड उपलब्ध होते. लाकडा व्यतिरिक्त सागवानाची साल आणि पाने औषध बनवण्यासाठी देखील वापरली जातात. तसेच प्लायवूड, जहाजे, रेल्वेचे डबे आणि इतर फर्निचर बनवण्यासाठीही सागवानाच्या लाकडाचा वापर केला जातो. Business ideas
अशा प्रकारे करा सागवानाची लागवड
सागवानासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या मातीची गरज नसते. अगदी चिकणमाती असलेल्या जमिनीतही साग सहजपणे वाढते. मात्र हे लक्षात ठेवा कि, पाणी साचलेल्या ठिकाणी सागवानाची लागवड करू नये. कारण पाणी साचल्यामुळे सागवानाच्या झाडांवर रोग होऊन ते सुकतात. सागवानाची झाडे साधारणपणे 15 ते 40 अंश तापमानात चांगली वाढतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ ही रोपे लावण्याचा योग्य काळ आहे. Business ideas
खर्च किती येईल ???
सागवाना रोपे थोडी महाग असतात. त्यामुळे जर आपण बियाण्यांपासून स्वतः रोपे तयार करून लागवड केली तर त्यासाठी कमी पैसे लागतील.मात्र हे लक्षात ठेवा कि, लागवड करण्यासाठी सागवान रोपाचे वय किमान 18 महिने असावे लागते. त्यामुळे रोपवाटिकांमधून रोपे विकत घेऊनच शक्यतो शेतकरी ते लावतात. Business ideas
चांगल्या जातीच्या सागवानाची किंमत सुमारे 60 रुपये . तसेच एका एकरात याची किमान 400 झाडे लावता येतात. अशाप्रकारे एका एकरात रोपे लावण्यासाठीफक्त रोपांवरच 24,000 रुपये खर्च येईल. यानंतर रोपे लावण्यासाठी जमीन तयार करणे, खड्डे बुजवणे यावरही खर्च येईल. एका एकर सागवान शेतीसाठी पहिल्या वर्षी सुमारे 60 हजार रुपये खर्च येईल. त्यानंतर त्यावरील खर्च निम्म्याहून खाली येतो.
किती नफा मिळेल ???
सागववानाचे एक झाड 12 वर्षात तयार होते. जे 25,000 रुपयांना विकले जाते. मात्र लावलेली सर्व सागवानाची झाडे एकत्र वाढणार नाहीत. यामध्ये जर एका एकरामध्ये 400 रोपे लावली असतील तर त्यातील निम्मी रोपे 12 वर्षांनी कापण्यासाठी तयार होतील. अशाप्रकारे शेतकऱ्याला 12 वर्षांनंतर कोट्यवधी रुपये मिळतील. तसेच यानंतरही त्याची कमाई आणखी अनेक वर्षे चालू राहील. सागवानाचे आयुष्य 200 वर्षे असते. तसेच याचा एक फायदा असा देखील आहे कि, सागवानाचे रोप एकदा कापले की ते पुन्हा वाढते. Business ideas
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nabard.org/xls/teak.XLS
हे पण वाचा :
Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!
ज्येष्ठ नागरिकांच्या Health Insurance क्लेमसाठी जास्त का लागतो ??? यामागील कारणे जाणून घ्या
ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…